माझा सभासद माझी जबाबदारी.

 ठाणे :- जगात कोरोना महामारीने   थेमान घातले असतांना महाराष्ट्र राज्या कोरोना चा उद्रेक जास्त प्रमाणात वाढत आहे.संपूर्ण राज्य शासन व मनपा आरोग्य यंत्रणा दिवसरात्र नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी स्वताच्या जीवाची कुटुंबाची पर्वा न करता कार्यरत आहेत.पण वाढता संसर्ग व मर्यादित यंत्रणा,त्यामुळे राज्य शासन व मनपा आरोग्य सेवेवर मोठा प्रभाव पडत आहे. कोरोना नियंत्रनात येणे ही काळाची गरज आहे.राज्य सरकार ला व मनपा ला सहकार्य करणे हे सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी म्हणून स्वीकारले पाहिजे.कोरोना संसर्ग लाट दुसरी असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.अश्या वेळी आपण आपला सोसायटी तील सभासद व त्याचे कुटुंबातील सभासद ही आपली जबाबदारी असून त्याच्या आरोग्याची काळजी सर्व सोसायटीतील इतर सभासदांनी घेतली पाहिजे त्या अनुषंगाने इमारती च्या कार्यकारणी ने वाढता कोरोना संसर्ग पाहता पूर्व तयारी म्हणून आपल्या इमारती च्या गच्चीवर, मोकळ्या जागेत,(प्रिमायसेस) मध्ये तात्पुरते स्वरूपाचे असोलिशन बेड तयार करून सौम्य व अति गंभीर स्वरूपाच्या नसलेल्या आपल्या कोरोना बाधित सभासदांना राज्य व मनपा यांच्या मार्गदर्शनाखाली,परवानगी घेऊन औषध उपचार करता येऊ शकतो का याचा विचार केला पाहिजे व त्यामुळे वयोवृद्ध गटातील व तीव्र कोरोना बाधित,गंभीर प्रकृती असणाऱ्या इतर रुग्णाला ज्यांना अतिशय गरज आहे अश्या रुग्णांना  शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होऊ शकतो व शासकीय यंत्रणे वरील ताण ही कमी होण्यास मदत होईल. ही वेळ कोणावर ही येउ शकते याची जाणीव सर्व नागरिकांनी ठेवली पाहिजे व एकमेकांना शासकीय मार्गदर्शनाखाली सहकार्य करायला हवे तरच कोरोना जाईल व माणुसकी जिवंत राहू शकेल.प्रत्येक वेळेस शासनाने कायदे करण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेनेही अश्या संकटात शासनाला आपल्या स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी साठी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.