ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.

 फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.



ठाणे :-  ठाण्यात  विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांसाठीच 'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्र उद्यापासून सुरू करण्यात येत असून केवळ 100 ज्येष्ठ नागरिकांनाच दुपारी 2 ते 5  या वेळेत कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. दरम्यान सदर केंद्रावर फक्त कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार असून ज्या नागरिकांनी पहिल्या डोससाठी नोंदणी केली आहे त्यांना लस देण्यात येणार नाही तरी त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे 

   

      शहरात लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राइव्ह इन' सुविधा ठाणे महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. विविनाना मॉलच्या पार्किंग केंद्रावर रोज नोंदणी केलेल्या 100 जेष्ठ नागरीकांच दुसरा डोस देण्यात येणार  आहे. 

     

     ही सुविधा ६० वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून फक्त दुसऱ्या डोसच या केंद्रावर घेता येणार आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखी एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. सदरच्या केंद्रावर नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांच कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येणार असून ज्या नागरिकांनी पहिल्या डोससाठी नोंदणी केली आहे त्यांना लस देण्यात येणार नाही तरी त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे