छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई

 





ठाणे :- आज बुधवार दिनांक १२/०५/२०२१  रोजी सलग दुसऱ्या दिवशी  ठामपा परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी छ.शिवाजी महाराज चौक कळवा येथील बस थांब्याला  भेट देऊन कळवा परिसरातून ठाणे शहर व मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसी संवाद साधला.कालपासून सुरू केलेल्या   TMT बसेसच्या चारही फेऱ्या पूर्ण भरुन जात असल्याने व प्रवाशांकडून आणखी बसेसची मागणी होत असल्याने सभापती जोशी यांनी आणखी चार बसेस किंवा जेवढी  मागणी होईल तेवढ्या बसेस  *छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका*  या मार्गावर सोडण्याचे मान्य केले ...सदर वेळी  प्रवाशांसी संवाद साधून त्यांच्या शंकांचे नीरसन केले ..सभापती जोशी व  काकडे यांचे कळवा प्रवासी संघाचे विजय देसाई यांनी आभार मानले आहेत